इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईत आज शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गटाच्या मेळाव्यात नेते काय बोललात व कोणावर टीका करतात हे महत्त्वाचे आहे. गेल्या वेळेपेक्षा या मेळाव्यात संघर्ष कमी दिसत असला तरी एकमेकांना काटशह देण्याचे काम या मेळाव्यातून केले जाणार आहे.
ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना म्हणून मान्यता देऊन चिन्ह दिल्यानंतर हा पहिलाचा मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्यात अधिकृतपणे आता चिन्ह दिसणार आहे.
या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे हे उध्दव ठाकरे यांना लक्ष करण्याबरोबरच आपल्या कामांची माहिती देतील. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे हे केंद्र, राज्य सरकार बरोबरच शिंदे, फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतील. त्यामुळे आता हे दोन्ही नेते कसा हल्ला करतात व त्यातून काय प्रतिक्रिया उमटते हे महत्त्वाचे आहे.