नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुकताच केंद्रातील एनडीए सरकारचा शपथविधी होऊन अनेक मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. केंद्रीय कृषी मंत्र्यांना नाशिकच्या सटाणा येथील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बटाट्यावर त्यांचे चित्र साकारले आहे. केंद्रीय कृषीमंत्री हे बटाटा उत्पादक पट्ट्यातील असल्याने त्यांचे बटाट्यावर चित्र रेखाटून सोबत कांद्यावर एक संदेश सुध्दा लिहिला आहे..भारत हा कृषी प्रधान देश आहे, सरकारने कृषी वर विशेष लक्ष दिले पाहिजे..असा संदेश कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या मोरे यांनी लिहित अनोख्या पध्दतीने केंद्रीय कृषी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहे.