नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेहडी पंपीग भागात बाधकाम सुरू असलेल्या साईटच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ३७ वर्षीय मजूराचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून श्रीकांत नवनाथ टिकल (रा.सिध्देश्वर मंगल कार्यालयासमोर देवळाली गाव) असे मृत मजूराचे नाव आहे. श्रीकांत टिकल हा श्री साई डेव्हलपर्सच्या चेहडी पंपीग स्टेशन भागात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली.
बांधकाम साईटवरील सहाव्या मजल्यावर काम करीत असतांना श्रीकांत टिकल हा मजूर जमिनीवर कोसळला होता. ही घटना सोमवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास घडली. साईट सुपरवायझर रोशन बुधवंत यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रानी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.