नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तुला जगू देणार नाही अशी धमकी देत खाद्यपदार्थ विक्री करणा-या एका व्यावसायीक महिलेचा दोघांनी विनयभंग केल्याची घटना रविवार कारंजा भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन गांगुर्डे व त्याचा मित्र अशी महिलेचा विनयभंग करणा-या संशयितांची नावे आहेत. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर महिला रविवार कारंजा भागात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करते. रविवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास ती खाद्यपदार्थाचा गाडा लावत असताना ही घटना घडली. दोघा संशयितांनी महिलेस गाठून तुला या ठिकाणी जगू देणार नाही तसेच तुझी गाडी बंद करून टाकू अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. अधिक तपास पोलीस नाईक शेवरे करीत आहेत.