नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंबड लिंकरोड भागात राहणा-या ३० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामदास अशोक पवार (रा.दत्तमंदिर,अंबडलिंकरोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पवार यांनी शनिवारी (दि.८) अज्ञात कारणाातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच भाऊ केशव पवार यांनी त्याना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.