माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…..
१-मान्सून स्थिती –
मान्सूनची फक्त अरबी समुद्रीय शाखाच कोकण मध्य महाराष्ट्रातच पुढे सरकत आहे. बं. उपसागरीय शाखा अजुनही जाग्यावरच असल्यामुळे मान्सून संपूर्ण विदर्भ व उर्वरित मराठवाड्यात वेगाने झेपावण्यास काहीशी अडचण जाणवत आहे.
२-मान्सून आज कुठपर्यंत पोहोचला?
मान्सून आज २४ तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात, मुंबई ठाणे नगर बीड पासून डहाणू नाशिक छ. सं. नगर पर्यंत पोहोचला आहे.
३-कोकण, म. महाराष्ट्रातील पाऊस
मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात १५ जूनपर्यंत जोरदार ते अति जोरदार तर खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या १० जिल्ह्यात गुरुवार दि.१३ जून पर्यन्त मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते. आज उद्या खान्देशात वळीव पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यताही नाकारता येत नाही.
४-विदर्भ मराठवाड्यातील पाऊस स्थिती-
संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात वळीव पूर्व मोसमी व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात बुधवार दि. १२ जून पर्यन्त मध्यम मोसमी पावसाची शक्यता जाणवते.
५-मान्सून साठी अनुकूल/ प्रतिकूल वातावरणीय स्थिती
(i) मराठवाडा परिसरातील ९०० मीटर उंचीपर्यंतची चक्रीय वाऱ्याची स्थिती मान्सून व त्याच्या प्रगतीसाठी पूरक जाणवते. तर खालील स्थिती मान्सून प्रगतीसाठी पूरक नसली तरी पोहचलेल्या ठिकाणी पाऊस पडण्यास पूरक ठरु शकते.
(i) मान्सून २१ ते २३ डिग्री अक्षवृत्तापर्यन्त पोहोचला. पण अक्षवृत्त समांतर, मध्य तपांबंर पातळीतील (३.१ ते ५.८ किमी.)उभ्या लंबरेषा उंचीवरील पूर्व- पश्चिम वाऱ्यांचा शिअर झोन अठरा डिग्री अक्षवृत्तावरच आहे, व शिवाय त्याची जाडी कमी झाली आहे. म्हणजेच हा शिअर झोन मान्सून सीमा रेषेच्या दक्षिणेकडे म्हणजे निलंगा तुळजापूर माढा फलटण वाई श्रीवर्धन दरम्यान आहे. तर मान्सून डहाणू नाशिक छ. सं. नगर पूर्व- पश्चिम रेषे दरम्यान आहे. त्यामुळे बघू या, मान्सून पोहोचला तेथे किती पाऊस देतो, व खान्देश, विदर्भ व उर्वरित मराठवाड्यात केंव्हा पोहोचतो.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.