इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. कांगपोकपी जिल्ह्यात हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांचा ताफा मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात जात असतांना हा हल्ला झाला. त्यांच्या ताफ्यावर अनेक राऊंड फायर करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्त्युत्तर दिले. हा गोळीबार बराच वेळ चालला.
या हल्ल्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत निषेधार्ह आहे. हा थेट मुख्यमंत्र्यांवर, म्हणजे थेट राज्यातील जनतेवर हल्ला आहे.