नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक परिसरातील बुधवार पेठ येथील पाटील गल्लीत विद्यूत वाहिनीस धक्का लागल्याने गवंडी काम करणा-या कामगाराचा मृत्यू झाला. रविंद्र नामदेव खरपडे (२५ रा.देवडोंगरा ता.त्र्यंबकेश्वर) असे मृत गवंडी काम करणा-या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खरपडे शनिवारी (दि.८) बुधवार पेठ पाण्याच्या टाकीजवळ सागर पाटील यांच्या बांधकामावर गवंडी काम करीत असतांना ही घटना घडली. काम करीत असतांना हातातील बॉटमची पट्टी जवळून गेलेल्या विद्यूत वाहिनीस लागल्याने ही दुर्घटना घडली.
या घटनेत खरपडे फेकले गेल्याने गंभीर अवस्थेत रामेश्वर बेलदार यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.सुभी भटनागर यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.