नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची प्रक्रियेत अमोल बाळासाहेब दराडे, सारांश महेंद्र भावसार यांचे वय ३० वर्षापेक्षा कमी वय असल्याने त्यांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरवण्यात आले.
३१ मे ते ७ जून या कालावधीत ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशपत्रे दाखल केली होती, त्यापैकी १ दराडे किशोर भिकाजी यांच्या शपथपत्राबाबत, उमेदवार बोठे रणजित नानासाहेब यांचे प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आला. दराडे किशोर यांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले.
आता या निवडणुकीत ३६ उमेदवार वैधरित्या नामनिर्दिष्ट झालेले आहेत. १२ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यत उमेदवार माघार घेऊ शकतील. त्यानंतर उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे.