इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत. भाजपचे रार्ष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सहा जूनला मुदत संपली असून त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागले आहे. त्यामुळे आता नव्या अध्यक्षांची निवड लवकरच होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महासचिव विनोद तावडे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहेत.
केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते राज्य पातळीपर्यंत मोठे बदल होणार आहे. नड्डा यांचा कार्यकाळा सहा जून रोजी संपला आहे. त्यानंतर आता भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत.
या अगोदर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत होती. पण, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे आता ही संधी तावडे यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तावडे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विश्वास आहे.