इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नरेंद्र मोदी यांनी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारताच पहिली सही शेतक-यांसाठी केली आहे. मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणा-या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर आता देशातील कोट्यवधी शेतक-यांच्या बँक खात्यात २००० रुपये येणार आहेत.
देशातील शेतकरी १७ व्या हप्त्याची वाट पाहत होते. सध्या पेरणाची दिवस सुरु आहे. त्यामुळे नव्या सरकारची स्थापना होताच. पंतप्रधान यांनी हा निर्णय घेतला. ही योजना २०१८ पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६ हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.