इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चांदवड शहरासह तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला. शहरातील सोनवार पेठ भागात तर रस्त्यांवरुन नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते. रस्त्यावरील जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील एक वॅगनर कार या पाण्याच्या प्रवाहात उलटी वाहत गेली. एकंदरीतच पहिल्याच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. लवकरच शेतीच्या पेरण्यांना सुरुवात होण्याची आशा शेतक-यांनी व्यक्त केली.