इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईला मुसळधार पाऊस व वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने झाडे उन्मळून पडली. विक्रोळीत निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघे ठार झाले. त्यात बाप लेकांचा समावेश आहे. नागेश रेड्डी आणि रोहित रेड्डी अशी त्यांची नावे आहेत. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. .
विक्रोळी पार्क साइट परिसरात टाटा पावर हाऊसच्या इमारतीचा काही स्लॅब कोसळून दोघेही स्लॅबखाली दबले. पोलिस आणि बचावपथकाने बापलेकांना मलब्याखालून काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, रविवारी रात्रभर मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले. परळ भागातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येऊन अनेकांच्या घरात पाणी शिरले.