इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रख्यात क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले: “प्रख्यात क्रिकेटपटू बिशनसिंग बेदीजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्याची खेळाबद्दलची आवड अतुट होती आणि त्यांच्या अनुकरणीय गोलंदाजीच्या कामगिरीमुळे भारताने अनेक संस्मरणीय विजय मिळवले. ते सदैव भविष्यातील क्रिकेटपटूंना प्रेरणा देत राहील. त्यांच्या कुटुंबीयासोबत आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना. ओम शांती असे आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
बिशन सिंग बेदी यांचे आज निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. बिशन सिंग बेदी यांनी १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या. १९६७ ते १९७९ या काळात ६७ कसोटी सामन्यांमध्ये ते भारताकडून खेळले. त्यावेळेस सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांच्या नावावर सात विकेट्स आहेत. सरदार ऑफ् स्पीन म्हणून त्यांना ओळखले जात.
भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीमध्ये इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांचे नाव अगोदर घेतले जाते. त्यात बिशन सिंग बेदी यांचा वाटा मोठा होता. त्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान यांनी शोक व्यक्त करतांना म्हटले की, अनुकरणीय गोलंदाजीच्या कामगिरीमुळे भारताने अनेक संस्मरणीय विजय मिळवले.