इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जम्मू – काश्मीरमध्ये रियासी भागात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात १० जण ठार झाले आहे. हल्ल्यानंतर ही बस दरीत कोसळली. शिवखोरी मंदिराकडे जाणा-या या यत्रेकरुंची बस पोनी भागातील तेरयाथ येथे दरीत कोसळली आहे. दहशतवाद्यांनी बसवर ४० ते ४५ राऊंड फायर केले. घटनास्थळी पोलिस, सुरक्षा यंत्रणाचे जवान आणि बचाव पथक दाखल झाले आहेत. बसमध्ये ४० प्रवासी होते. सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.
या घटनेनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, आम्ही आमच्या लोकांवरील या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आणि आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचा जाणीवपूर्वक अपमान करत असल्याचा निषेध करतो.
तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये बस दरीत कोसळल्याने १० लोक ठार, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली. मी या हल्ल्याचा निषेध करतो. पूर्वी सर्व अतिरेक्यांपासून मुक्त झालेल्या भागात परतताना पाहणे दुर्दैवी आहे.