इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्ह्यात आज दुपार पासून वादळी वारा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील उमराणे येथे वादळी वारा व जोरदार पावसामुळे कांद्याच्या शेड जवळ आश्रयासाठी थांबलेले तिसगाव येथील भाऊराव शंकर देवरे व त्यांचा मुलगा देविदास हा थांबलेला असतांना वादळी वा-याने लोखंडी पत्र्यांचे शेड कोसळून देविदास भाऊराव अहिरे हा ३० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तिसगाव गावात विज पडून आकाश देवरे या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वादळी वा-यामुळे उमराणे परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळले. त्याचबरोबर अन्य ठिकाणी कांदा व्यापा-याचे शेड कोसळून शेड मधील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.