इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आज राष्ट्रपती भवनात थोड्याच वेळात पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. सकाळी मोदी यांच्या निवासस्थानी चहापानाच्या बैठकीला एनडीएचे संभाव्य मंत्री उपस्थित होते. यासर्वां बरोबर नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यांना १०० दिवसाच्या रोड मॅपविषयीची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सुचना यावेळी केल्या. पंतप्रधान मोदी यांच्याबरबोर ६५ खासदार केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणार आहे.
पंतप्रधान आज संध्याकाळी ७.१५ वाजता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सर्व सोहळ्याचा कार्यक्रम आपण लाईव्ह बघा…









