इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अगोदर असलेल्या तब्बल २० केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. यात काही जणांचा पराभव झाला तर काहींना निवडून आल्यानंतरही संधी मिळाली नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर यातील काहींना संधी मिळू शकते. एनडीए सरकार असल्यामुळे अनेकांचे नाव वगळण्यात आले आहे.
गेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले स्मृती ईराणी, राजीव चंद्रशेखर, अनुराग ठाकूर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्हीके सिंह, आश्विनी चौबे, अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आरके सिंह, अर्जुन मुंडा, निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, जॅान बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे, भागवत कराड हे नव्या मंत्रिमंडळात दिसणार नाही.
जे पराभूत झाले आहे. त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपदावर घेता येऊ शकते. पण, ती संधी पराभव झालेल्यांना मिळालेली नाही.