नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गॅसच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या २० वर्षीय विवाहीतेचा मृत्यू झाला. गेली तीन महिने सदर महिलेवर उपचार सुरू होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आकांक्षा काशिनाथ जाधव (रा.रिध्दी सिध्दी रो हाऊस,तांबोळीनगर हिरावाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. आकांक्षा जाधव या प्रसुतीसाठी आपल्या माहेरी शाहूनगर जि.परभणी येथे गेल्या होत्या. ६ मार्च रोजी स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसचा भडका उडाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. माहेरकडील मंडळीने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते.
त्यानंतर १६ मे रोजी त्यांना नाशिकच्या सिव्हील रूग्णालयात हलविण्यात आले. प्रकृर्तीत सुधारणा झाल्याने ३० मे रोजी त्यांना घरी सोडण्यात आले होते. शनिवारी (दि.८) आकांक्षाची प्रकृर्ती खालावल्याने तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.
……..