इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एनडीए सरकारमध्ये एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती. पण, ही जागा राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही असल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. अजित पवार गटाचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता. त्यामुळे ते यावेळेस मंत्रिमंडळात सामील होणार नाही. विस्ताराच्या वेळी ते मंत्रिमंडळात सामील होतील असे आता बोलले जात आहे.
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो. पण, प्रफुल्ल पटेल हे अगोदर कॅबिनेट मंत्री राहिलेले आहे. त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारवर काम करणे कसे शक्य आहे. असा प्रश्न राष्ट्रवादीला पडला.
पण, एनडीए सरकार बनवतांना काही निकष ठरवले आहे. त्यामुळे एक खासदार असलेल्या पक्षाला कॅबिनेट मंत्री कसे द्यावे असा प्रश्न असल्यामुळे तुर्त अजित पवार गटाचा कोणीही मंत्री होणार नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने तुम्ही विस्ताराच्यावेळेला आमचा विचार करा असे सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराच्यावेळेला अनेकांचा विचार होईल असे सांगितले.