इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर मंत्री सुध्दा शपथ घेणार आहे. पण, यात विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे, भागवत कराड यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपतर्फे त्यांना फोन करुन तुम्हाला यावेळेस संधी नाही असे सांगण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात सहा जणांना संधी मिळणार आहे.
त्यात राज्यातून भाजपतर्फे नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, शिंदे गटातर्फे प्रतापराव जाधव, रिपाइंचे रामदास आठवले यांची नावे केंद्रीय मंत्रिमंडळात निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. या सर्वांना शपथविधीचा फोन गेला आहे.
मोदीं यांच्यासह कोण कोण मंत्री पदाची शपथ घेवू शकतात याची चर्चा शनिवारी दिवसभर होती. त्यानंतर आता फोन आल्याच्या बातम्या येत आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना अद्यापही फोन आलेला नाही. त्यामुळे या गटातर्फे कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.