नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूर गावातील गोवर्धन भागात राहणा-या ४४ वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही मात्र मृत पतीच्या वर्षश्राध्दाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तिने स्व:ताचे जीवन संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणी नाशिक तालूका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राणी सुरेश शिंदे (रा. होळी चौक,गोवर्धन) असे मृत महिलेचे नाव आहे. राणी शिंदे यांनी शनिवारी (दि.८) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचन मध्ये लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ अरूण सोनवणे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालायात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
मृत शिंदे यांच्या पतीचे गेल्या वर्षीच निधन झाले होते. शुक्रवारी (दि.७) पतीच्या वर्षश्राध्दचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राणी शिंदे यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पती विरहातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.