इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदीं यांच्यासह कोण कोण मंत्री पदाची शपथ घेवू शकतात याची चर्चा शनिवारी दिवसभर होती. नितीश कुमारांच्या जेडीयूला ३ कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ज्यात ललन सिंह, रामनाथ ठाकूर, संजय कुमार झा यांची नावे आघाडीवर आहेत. लोकजनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांना १ कॅबिनेट मंत्रिपद, हिंदूस्थान आवाम मोर्चाचे जीतन राम मांझी निवडून आलेत त्यांना १ कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. आंध्र प्रदेशात, चंद्राबाबूंच्या टीडीपीचे NDAत मित्रपक्ष म्हणून सर्वाधिक १६ खासदार आहेत. टीडीपीला ४ कॅबिनेट आणि २ राज्य मंत्रिपद मिळू शकते.
महाराष्ट्रातून भाजपचे ४ कॅबिनेट मंत्री होवू शकतात. ज्यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंची नावं चर्चेत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा एक जण मोदींसोबत शपथविधी घेवू शकतो. त्यासाठी , प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील मानेंचं नाव चर्चेत आहे. तर अजित पवार गटाकडून एका कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित झाले आहे.
एनडीएच्या मित्रपक्षांकडून तगड्या मंत्रालयाची मागणी सुरु आहे. पण भाजप ४ महत्वाची खाती ज्यात गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र खातं स्वत:कडेच ठेवणार आहे. ही खाती सोडण्यास भाजप तयार नाही.