नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –नाशिकचे स्वच्छतादूत पर्यावरण प्रेमी चंद्रकिशोर पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे. पाटील हे नाशिक मध्ये गोदावरी नदी, नंदिनी नदी व शहर स्वच्छते साठी सातत्याने कार्य करत असतात. पंतप्रधानांनी आपल्या लोकप्रिय कार्यक्रम मन की बात मध्ये सुद्धा त्यांचे “स्वच्छाग्रही” म्हणून कौतुक केले आहे.
नाशिकमध्ये अजून कोणाला आमंत्रण मिळाले हे समोर आले नाही. पण, या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी हे तिस-यांदा शपथ घेणार असून हा एेतिहासिक क्षण आहे. तो चंद्रकिशोर पाटील यांना अनुभवता येणार आहे. ८००० अजून अधिक मान्यवरांना या शपथविधीचे आमंत्रण देशभरात देण्यात आले आहे. तर शेजारील राष्ट्राचे प्रमुखही या सोहळ्याला उपस्थितीत राहणार आहे.