इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यात शनिवारी एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे. पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या असल्याची टीका काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,कारण “पाऊसच जास्त झाला” असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे. सुखरूप घरी पोहचा… काळजी घ्या…