इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील कल्याणीनगर कार दुर्घटनेतील आरोपी मुलाचा आजोबा सुरेंद्र अगरवालचे महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आल्यानंतर आता एमपीजी क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे.
या कारवाई नंतर काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण प्रकाशझोतात आल्यावर प्रशासन कारवाई करत आहे, याचा अर्थ इतके दिवस हे सगळं माहीत असूनही प्रशासन गप्प होते. अगरवालचे अनेक अवैध धंदे, हत्या, फसवणुक, दमदाटी केल्याची अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. अशा गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांनी पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी.
आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल
अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहेत, पोलिस खिशात घेऊन फिरतो, तुझा अजय भोसले करीन, त्याला ठोकला तसा तुला ठोकीन, तो वाचला पण तू वाचणार नाही, अशी धमकी देऊन इस्टेट एजंटची एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कार दुर्घटना प्रकरणातील आरोपीचे वडील आणि आजोबाविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने आता त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. मुश्ताक शब्बीर मोमीन (४५, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेंद्र ब्रह्मदत्त अग्रवाल (७७), विशाल अग्रवाल (५०), जसप्रीतसिंग राजपाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे