गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मान्सून कुठपर्यंत आला? संपूर्ण महाराष्ट्रात कधी आणि कसा बरसणार?

by India Darpan
जून 8, 2024 | 7:45 pm
in संमिश्र वार्ता
0
rainfall alert e1681311076829


माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- मान्सून कुठपर्यन्त पोहोचला.
मान्सून आज महाराष्ट्रातील हर्णाई, बारामती व तेलंगणातील निझामबाद पर्यंत पोहोचला असून मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे.

२-मुंबईतील पाऊस कसा असेल?
दक्षिण कोकण कि. पट्टी समोरील अरबी समुद्रातील हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे, मुंबईसह संपूर्ण कोकणात आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार दि. १५ जूनपर्यन्त जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते. काही ठिकाणी अतिवृष्टीचाही अनुभव मुंबईकरांना ह्या आठवडयात येऊ शकतो, असे वाटते.

३-मध्य महाराष्ट्रात पाऊस कसा?
मुंबईतल्या ह्या पावसामुळे नैरूक्त मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा उर्जीतावस्थेत येऊन मान्सून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश नाशिक नगर, छ.सं.नगर, तसेच संपूर्ण पुणे सातारा सांगली जिल्ह्यापर्यंत खेचला जाऊ शकतो. तेथे म्हणजे ह्या १८ जिल्ह्यात बुधवार दि. १२ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पूर्व मोसमी वा मोसमी पावसाची शक्यता जाणवते.

४- मराठवाडा, विदर्भात मान्सूनचा पाऊस कधी?
बंगाल मान्सूनी उपसागरीय शाखा एक आठवडा ओलांडला तरी ३१ मे पासून जाग्यावरच खिळलेली दिसत आहे. त्या शाखेचा मान्सून हिमालयीन प. बंगालच्या प्रवेश द्वारा पर्यन्त पोहोचला. त्याच्यापुढे खरं तर मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची अपेक्षा असते. परंतु त्या पद्धतीने कोसळतांना जाणवत नाही. त्यामुळे त्या शाखेची मान्सूनची प्रगती होतांना दिसत नाही. आणि त्याचा परिणाम विदर्भ मराठवाड्यातील मान्सून च्या प्रगतीवर होतांना दिसत आहे.म्हणून तर विदर्भ मराठवाड्यात सध्या फक्त तूरळक ठिकाणी किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते. मान्सून च्या चांगल्या हजेरीनंतरच तेथील शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा असे वाटते. बघू या १५ जूनपर्यंत काय घडामोड घडते.

५- महाराष्ट्रात खरीप पेरणीची स्थिती काय असु शकते?
महाराष्ट्रात १५ जूनपर्यन्त जो काही पाऊस होईल, त्या ओलीवरच चांगल्या प्रतीच्या जमिनीत व जेथे १० से. मी.चांगली ओल साध्य झाली असेल म्हणजे पेर-उतार नंतर पीक रोप ३० ते ४० दिवस दम धरेल अश्याच खात्रीच्या ठिकाणी, २० जून दरम्यान पेरणी होवु शकते, असे वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अश्याच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावरच पेरणीचे धाडस २० जून दरम्यान करावे, असे वाटते. कारण १५ जूननंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फार सावधगिरीने, संयमाने पेरणीचे पाऊल टाकावे. असे वाटते.

६-सध्या मान्सूनसाठी वातावरणीय आशादायक चित्र काय आहे?
(i) जमिनीपासून ३ ते ६.५ किमी. उंच अश्या साडे तीन किमी. क्षेत्र हवेच्या जाडीत पूर्वकडून -पश्चिमेकडे व त्याच्या खाली पश्चिमेकडून -पूर्वेकडे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा उंचावरील असलेला ‘ शिअर झोन ‘ हा सध्या १६ डिग्री अक्षवृत्त समांतर म्हणजे मान्सून पोहोचलेल्या सीमा रेषेच्या थोडा उत्तरेकडे आहे. शिवाय
(ii)दुसरी प्रणाली म्हणजे अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते केरळ पश्चिम किनारपट्टीत समुद्रसपाटीपासून साधारण दिड किमी.उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजेच इंग्रजी ‘V’ अक्षरासारखा द्रोणीय तटीय आस म्हणजेच त्याला ‘ ऑफ-शोर-ट्रफ ‘ म्हणतात. त्याचे अस्तित्व जाणवत आहे. खरं तर हवामान शास्त्राप्रमाणे त्याला लगेचच ‘ ऑफ-शोर-ट्रफ ‘ म्हणणे चुकीचे ठरेल कारण अजुन मान्सून पूर्णपणे पोहोचला नाही. तरी देखील त्याच्या सदृश्य स्थिती आहे.
अश्या दोन मुख्य व लाभदायी प्रणालीमुळे मान्सून मध्ये ऊर्जा भरली जाऊन सध्या पावसाची शक्यता जाणवते.
अ. क्रं. ६ मधील माहिती संकल्पना स्पष्टता व प्रबोधनासाठीच दिली, असे समजावे, ही विनंती.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजप आमदारांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ही घोषणा

Next Post

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड

India Darpan

Next Post
Sonia Gandhi

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011