इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची कारणे आज पहिल्यांदा सविस्तरपणे पदाधिका-यांसमोर मांडली. भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना त्यांनी प्रमुख कारणेही सांगितले.
यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका करतांना सांगितले की, उद्धव ठाकरे यांना ठाणे आणि कोकणात एकही जागा मिळाली नाही. मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या ते कोणाच्या भरवणार मिळाल्या. मराठी माणसांनी मत दिले नाहीत. एका विशिष्ट समाजाच्या आधारावर ते निवडून आले. त्यांनी त्याची कबुली पण दिली. मुस्लीम समाजामुळे निवडून आल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही.
ज्या जागा भाजप हारलीये त्या खूप कमी टक्के मतांनी हारलोय. आपण कुठून हारलो हे सगळ्यांच्या लक्षात आले असेल. मालेगाव मध्य मध्ये १ लाख ९४ मतांचा त्यांना लीड मिळाला. भाजपच्या ११ जागा या ५ टक्के पेक्षा कमी मतांना हारलो.
जर त्यांना ३१ जागा मिळाल्या तर ते विधानसभेत ही रिफ्लेक्ट झाला पाहिजे. विधानसभा जागांवर आपल्याला ७१ जागांवर आघाडी आहे. महायुतीला ७६ मतदारसंघामध्ये आपल्याला आघाडी आहे. जनतेने नंबर एकची पार्टी भाजपलाच ठेवले आहे.
बघा संपूर्ण भाषण….