नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यानी सुमारे साडे पाच लाखाच्या ऐवज लंपास केला. वडाळा पाथर्डी मार्गावरील विराटनगर भागात झालेल्या या घरफोडीत सव्वा लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरीला गेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशिनाथ बाबुराव शेवाळे (रा. चौत्र व्टिन बंगलो,लेन नं. ५ सराफनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेवाळे कुटूंबिय शुक्रवारी (दि.७) सकाळी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज तोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली सव्वा लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५ लाख ४० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.