इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला. नील पर्वत डोंगराच्या पाठीमागे असणा-या बिल्व तीर्थ तलावावर या दोन्ही मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळेस ही घटना घडली. तनुजा युवराज कोरडे (१३), अर्चना बाळू धनगर (१३) असे मृत्यू झालेल्या दोन्ही मुलींचे नाव आहे.
या दोन्ही मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळेस अर्चना पाण्यात पडली. तीला वाचवण्यासाठी तनुजा पाण्यात उतरली. पण, या दोघी पाण्यात बुडाल्या. या घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.
या दोन्ही मुली कपडे धुण्यासाठी गेल्या. मात्र त्या नंतर दिसत नसल्यामुळे गावक-यांनी धाव घेतली. त्यानंतर या मुलींना तलावातून बाहरे काढण्यात आले. पण, त्यांचा मृत्यू झाला होता.