इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर १८ मंत्री शपथ घेणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय मंत्रीपदासाठी भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे चर्चेत आहे. यावेळेस शिंदे गटाला दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने यांची नावे चर्चेत आहेत.
अजितदादा गटालाही एक मंत्रीपद मिळू शकते. या मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नाव चर्चेत आहे. त्याचप्रमाणे रिपाइंचे रामदास आठवलेंनाही मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्राती महायुतीचे १८ खासदार आहे. त्यात कोणाची वर्णी लागते हे महत्त्वाचे आहे. यावेळेस नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्र्याची संख्या जास्त असणार आहे. त्यानंतर शिंदे गट व अजित पवार गटाला संधी मिळणार आहे.