इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीनं शिंदे गटाचे आमदार संपर्कात असल्याचे ठाकरे गटाचे नेते सांगत असतांना आता शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत खळबळ निर्माण केली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटातून निवडून आलेल्या दोन खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधल्याचेही सांगितले.
यावेळी त्यांनी दोन खासदार आले तर ते अपात्र होऊ शकतात. त्यामुळे खासदारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. किमान उबाठा गटातून ९ खासदार येणे आवश्यक आहे. तर अपात्रतेचा निकष लागू शकणार नाही. तशीही सहा जणांची गरज आहे. अपात्रतेवर मार्ग काढण्याची गरज आहे असा दावाही त्यांनी केला.
यावेळी ते म्हणाले की, देशात एनडीएच्या सरकारला पूर्ण बहुमत आहे. हे सरकार पाच वर्ष व्यवस्थित कारभार करेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे दोन खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत. यावेळी त्यांनी दोन दिवसात तुम्हाला कळेल उद्धव ठाकरेंवर हे खासदार नाराज आहेत. येत्या दोन दिवसात काही गोष्टी स्पष्ट होतील असेही त्यांनी सांगितले.