इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे उद्या म्हणजेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोघेही उद्या नवी दिल्लीला पोहोचतील. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी बुधवारी संध्याकाळी मोदी यांच्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून उपस्थित राहण्याचे मान्य केले.दक्षिण आशियातील चीन आणि पाकिस्तान वगळता अन्य देशांचे प्रमुख मोदी यांच्या शपथविधीस उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.
नेपाळच्या पंतप्रधानांनी फोनवरून आपल्या उपस्थितीची पुष्टी केली. बांगला देश आणि श्रीलंकेचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत. विक्रमसिंघे यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले. त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित ‘एनडीए’च्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. याशिवाय बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना आजच मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ढाका येथून रवाना होणार आहेत.
बांगला देशच्या पंतप्रधानांचे भाषण लेखक एम. नजरुल इस्लाम म्हणाले, की शपथ ग्रहण समारंभाच्या तारखांमध्ये बदल झाल्यामुळे शेख हसीना ढाका येथून आज दिल्लीसाठी रवाना होतील आणि शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.