नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यात काल संध्याकाळच्या सुमारास करंजाड परिसरात वादळी वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे ४० मिनिटे झालेल्या पावसाने सकल भागात पाणी साचले. वादळी वा-याने घरांच्या छतांची पत्रे उडाली तर भिंत कोसळून पाच ते सहा शेळ्या दगावल्या, तर विजेचे खांब व रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.