नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवळाली कॅम्प येथील गोकूळधाम भागात राहणा-या ३६ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विदेश विनोद डोरे (रा.शनि मंदिरामागे,गोकुळधाम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विदेश डोरे यांनी गुरूवारी (दि.६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच संजय फकिरा यानी त्यांना तातडीने कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. धीरज कटारे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.