नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैदयकिय बिल मिळवून देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कनिष्ठ लिपीक अतिष छगन भोईर हे पाच हजाराची लाच घेतल्याच्या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे सिझरींग झालेले औषधोपचाराचे हॉस्पीटल खर्च ९२ हजार ३७९ रुपयाचे वैदयकिय बिल मिळणेकामी वैदयकिय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केले असता, आरोपी लोकसेवक यांनी वैदयकिय बिलाची फाईल पुढील कारवाई करुन लवकर आणुन देणेकरीता तक्रारदार यांचेकडे एकुण बिलाचे ६ टक्के प्रमाणे ५ हजार ६०० रुपयाची लाचेची मागणी करुन, तडजोडअंती पंचा समक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन, सदर पाच हजार रुपये लाचेची रक्कम सामान्य रुग्णालय, नाशिक येथील प्रशासकिय कार्यालयातील त्यांचे कक्षेत स्विकारतांना रंगेहाथ पकडले.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष वय-३५
आलोसे – श्री. अतिष छगन भोईर वय ४५ वर्षे, व्यवसाय नोकरी, पद कनिष्ठ लिपीक, वर्ग ३, जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक रा. मानसी व्हिला बी, रो हाउस नंबर ३, बनारसी नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक
*लाचेची मागणी- ५,५००/-
*लाच स्विकारली- ५,०००/-
*हस्तगत रक्कम- ५,०००/-
*लालेची मागणी – दि. ०७/०६/२०२४
*लाच स्विकारली – दि.०७/०६/२०२४
तक्रार:-तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे सिझरींग झालेले औषधोपचाराचे हॉस्पीटल खर्च ९२,३७९/- रुपयाचे वैदयकिय बिल मिळणेकामी वैदयकिय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केले असता, आरोपी लोकसेवक यांनी वैदयकिय बिलाची फाईल पुढील कारवाई करुन लवकर आणुन देणेकरीता तक्रारदार यांचेकडे एकुण बिलाचे ६ टक्के प्रमाणे ५,६००/- रुपयाची लाचेची मागणी करुन, तडजोडअंती पंचा समक्ष ५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन, सदर ५,०००/- रुपये लाचेची रक्कम दिनांक ०७/०६/२०२४ रोजी १८:०० वा. चे सुमारास पंच साक्षीदारा समक्ष सामान्य रुग्णालय, नाशिक येथील प्रशासकिय कार्यालयातील त्यांचे कक्षेत स्विकारतांना रंगेहाथ पकडले असून यातील आलोसे यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी-मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, नाशिक
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- *सापळा अधिकारी –
श्री. स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक - *सापळा पथक – पोहवा/ प्रभाकर गवळी, पोहवा/ संतोष गांगुर्डे, पो.ना. सुरेश चव्हाण