नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विभागीय महसूल कार्यालयात शिवसेनेचे शिंदे गट व ठाकरे गटात राडा झाला. हे दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यामुळे जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी धक्काबुक्की झाल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत राडा करणा-या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे व ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे दोन्ही उमेदवार आज समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकाचवेळी आल्यामुळे हा गोंधळ उडाला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह दोन्ही गटाचे प्रमुख नेते उपस्थितीत होते.