इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानाचे स्थान देण्यात आले.
‘एनडीए’मधील पक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीच्या वेळी पवार हे शाह यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते, तर शिंदे हे मंचावर नितीश कुमार यांच्या शेजारी बसले होते. फडणवीस हे ‘एनडीए’च्या नेत्यांसोबत सेंट्रल हॉलमध्ये बसले होते. त्यांच्या त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे पवार शिंदे यांना मंचावर बसण्याचा मान मिळाला.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनडीए’च्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू आणि संयुक्त जनाता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकारला पाठिंबा देणाऱ्या खासदारांची यादी दिली.