इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: कंगना राणौतला सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबलने मारलेल्या थप्पडवर, शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले काही लोक मते देतात आणि काही थप्पड देतात. मला माहित नाही की प्रत्यक्षात काय झाले आहे.
यावेळी त्यांनी पुढे बोलतांना सांगितले की, जर हवालदाराने असे म्हटले असेल की तिची आई आंदोलनाला बसली होती, मग शेतकरी आंदोलनात तिची आई असती आणि विरोधात कोणी काही बोलले तर संताप निर्माण होईल.
यावेळी त्यांनी कंगना राणौत आता खासदार आहे. आता खासदारावर हल्ला होऊ नये हे बरं नाही. पण, शेतकऱ्यांचाही सन्मान झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.