इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बँक ऑफ इंडियाने बुधवार १२ जून २०२४ रोजी देशभरातील तिच्या सर्व शाखा/ झोन आणि FGMO मध्ये वन टाइम सेटलमेंट (OTS) अंतर्गत कर्जदारांच्या NPA कर्ज खात्यांची पुर्तता करण्यासाठी समझौता दिवसाचे आयोजन केले आहे.
समझौता दिवस विशेषतः अशा NPA कर्जदारांसाठी तयार करण्यात आला आहे जे कर्जदाराच्या व्यवसायातील/वैद्यकीय स्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही खऱ्या कारणामुळे कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत. बँकेकडे लहान किमतीची खाती आणि मध्यम आकाराची खाती सेटल करण्यासाठी विशेष OTS योजना आहेत. ज्याद्वारे ज्या कर्जदारांची खाती NPA आहेत त्यांना विशेष आणि चांगल्या सवलती दिल्या जातात.
तरी सर्व कर्जदारांनी ज्यांची खाती NPA आहेत त्यांनी १२ जून रोजी NPA कर्ज खाती सेटल करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेने केले आहे.