इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत CBI ने विक्रीकर अधिका-याला ४० हजार रुपयाची लाच घेतांना अटक केली. ५ जून रोजी आरोपी विक्रीकर अधिकारी वर्ग-II/AVATO विरुद्ध लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईबाबत मिळालेली माहिती अशी की, जीएसटी आणि प्राप्तिकर सल्लागाराचे क्लायंट मेसर्स गुप्ता एजन्सीच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) च्या समस्येचे निराकरण केल्याबद्दल आणि उक्त एजन्सीची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सोडल्याबद्दल बक्षीस म्हणून १ लाख रुपये मागितले. त्यानंतर वाटाघाटीनंतर आरोपीने मागणी कमी केली आणि लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
CBI ने सापळा रचून आरोपी विक्रीकर अधिकारी वर्ग-II/AVATO याला तक्रारदाराकडून ४० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. दिल्लीतील आरोपींच्या निवासस्थान आणि कार्यालयाच्या परिसरात झडती घेण्यात आली.
आरोपीला सक्षम न्यायालयात हजर करण्यात आले.