इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जो काही निकाल लागला आहे त्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाहीत. या निकालाची सर्वस्व जबाबदारी माझी आहे हे मी मान्य करतो. कारण जनतेने दिलेला कौल आहे. आम्ही जनतेचा विश्वास संपादन करण्यात कुठेतरी कमी पडलो हे आम्हाला मान्यच करावं लागेल. जे काही अपयश आलं आहे त्याची जबाबदारी मी स्वत: स्वीकारली आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी
बारामतीच्या निकालावरही भाष्य केले. ते म्हणाले निकाल पाहून मी स्वत: आश्चर्यचकीत झालो. बारामतीचादेखील जो कौल आहे तो कौल, जो काही निकाल लागला आहे त्याबद्दल मी स्वत: आश्चर्य झालेलो आहे. मलाही समजत नाही की, गेल्या अनेक वर्ष मी तिथे काम करतोय. बारामतीकरांनी मला नेहमी पाठिंबा दिलेला होता. यावेळेस कशामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, बाकीचे मतदारसंघ तर बाजूलाच राहुद्या असेही ते म्हणाले.
शेवटी जनतेचा कौल असतो, तो कौल लोकशाहीत स्वीकारायचाच असतो. पुन्हा ना उमेद न होता लोकांसमोर जायचं असतं. मी कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतो की, यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं तर किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं. पुन्हा नव्या उमेदीने सगळ्यांनी काही महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमची साहजिकच महायुती आहे, या महायुतीत जे प्रमुख आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन जागावाटप करु असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. हे अतिशय स्पष्ट चित्र आज पाहायला मिळालं आहे. अर्थात विरोधकांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मला बाकी लोकांच्याबद्दल काही बोलायचं नाही