नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय खाणी ब्युरोच्या (आयबीएम ) तात्पुरत्या आकडेवारीनुसार, खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक ऑगस्ट, 2023 या महिन्यात 111.9 एवढा नोंदवण्यात आला. (आधार वर्ष 2011-12=100) हे प्रमाण ऑगस्ट, 2022 महिन्यातील स्तराच्या तुलनेत 12.3% जास्त आहे. त्याच वेळी, एप्रिल-ऑगस्ट, 2023-24 या कालावधीसाठी एकूण वाढ मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 8.3 टक्के आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये महत्त्वाच्या खनिजांचा उत्पादन स्तर पुढीलप्रमाणे होता : कोळसा 684 लाख टन, लिग्नाइट 28 लाख टन, नैसर्गिक वायू (उपयुक्त) 3110 दशलक्ष घन. मी., पेट्रोलियम (कच्चे) 25 लाख टन, बॉक्साइट 1428 हजार टन, क्रोमाईट 148 हजार टन, तांबे 10 हजार टन, सोने 113 किलो, लोह खनिज 181 लाख टन, शिसे 30 हजार टन, मँगनीज धातू 233 हजार टन, झिंक खनिज 132 हजार टन, चुनखडी 365 लाख टन, फॉस्फोराईट 107 हजार टन आणि मॅग्नेसाइट 10 हजार टन.
ऑगस्ट, 2022 च्या तुलनेत ऑगस्ट, 2023 मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांमध्ये पुढील खनिजे समाविष्ट आहेत : सोने (46.8%), फॉस्फोराइट (40.7%), मॅंगनीज अयस्क (36.9%), तांबे (18.9%), कोळसा (17.8%), लोह खनिज (14.9%), चुनखडी (13.8%), नैसर्गिक वायू (U) (9.9%), मॅग्नेसाइट (4.5%), पेट्रोलियम (कच्चे) (2.1%), क्रोमाइट (1.4%) आणि महत्त्वाच्या खनिजांमध्ये पुढील खनिजे समाविष्ट आहेत. : बॉक्साइट (-1.5%), झिंक खनिज (-4.1%), लिग्नाइट (-5.4%) आणि शिसे (-15.1%).