नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे १६ वी मिनी आणि ५ वी चाईल्ड गटाच्या राज्य स्तरीय स्पर्धेला गुरुवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उदघाट्न मल्टी गेम्स असोसिएशन ऑफ नाशिक.जिल्हा मल्टी गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडेयांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे छ्त्रपती पुरस्कार प्राप्त तथा क्रीडा संघटक अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे सचिव तथा भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे सहसचिव डॉ. उदय डोंगरे, छत्रपती पुरस्कार प्रपात आनंद खरे, दत्ता गलाले, राजू शिंदे, आणि इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बोलतांना हेमंत पांडे यांनी सांगितले की, मिनी (१४ वर्षाआतील) आणि चाईल्ड (१० वर्षाआतील) या वयापासून मुलांनी मैदानामध्ये खेळणे आवश्यक आहे. यामध्ये सातत्य राखून खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये प्राविण्य मिळवू शकतो असे सांगितले. राजू शिंदे यांनी प्रस्थविक केले तर डॉ. उदय डोंगरे यांनी स्पर्धेचा हेतू आणि खेळाडूंसाठी याचा किती फायदा होतो हे स्पष्ट केले.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून ४३० खेळाडूनी सहभाग नोंदवला आहे. उदघाटनानंतर स्पर्धांना सुरवात झाली. यामध्ये मुलांच्या मिनी गटात झालेल्या फॉईल या प्रकारात छत्रपती संभाजी नगरच्या श्लोक मुथा याने अंतिम लढतीत आपल्याच जिल्ह्याचा सहकारी आरोह नलावडे याचा ७-४ असा चार गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. तर मिनी गटात मुलीमध्ये मुंबई उपनगरच्या प्रत्युषा तभाने हीने सुंदर खेळाचे करून अंतिम लढतीत छत्रपती संभाजी नगरच्या अर्णवी धापसे हीच ६-२ असा पराभव करून विजेतेपद मिळविले या गटात रायगडच्या वेदिका श्रीनिवासन हिने तिसरा तर लातूरच्या सई पाटीलने चवथा क्रमांक मिळविला. आणखी दोन दिवस सुरु असणाऱ्या या स्पर्धेत सॅबर , फॉईल आणि इपी या सर्व प्रकारामध्ये स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक राजू शिंदे यांनी दिली.
गुरुवारी पार पडलेल्या स्पर्धाचे :निकाल :- सॅबर मुले : १) श्लोक मोटे (छत्रपती संभाजी नगर),२) आरोह नलावडे (छत्रपती संभाजी नगर),३) स्वराज कदम (लातूर), ४) सोहम लक्कास (छत्रपती संभाजी नगर).
सॅबर मुली : १) प्रत्युषा ताभणे ( मुंबई उपनगर) २० अर्णवी ढापसे (छत्रपती संभाजी नगर), ३) वेदिका श्रीनिवासन (रायगड), ४) सई पाटील (लातूर)