इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगलीचे नवनिर्वाचीत खासदार विशाल पाटील यांनी आज सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला पाठींबा दिला. या मतदार संघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाला जागा सोडली होती. त्यामुळे या जागेवरुन चांगलाचा वाद पेटला होता.
या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी विशाल पाटील यांना पाठींबा दिला. त्यामुळे येथे ठाकरे गट नाराज होता. काँग्रेसमधून बंडखोरी करत विशाल पाटील यांनी येथे उमेदवारी केली. पण, काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले नाही व कारवाई केली नाही.