इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर ही भेट घेण्यात आली.
यावेळी राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी सौ. शर्मिलाताई राज ठाकरे, आमदार नितेश राणे, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते.