इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बॉलिवूड अभिनेत्री खासदार असलेल्या कंगना रणौतला चंडीगड विमानतळावर CISF ची महिला जवान कुलविंदर कौर हिने कानशिलात लगावली आहे. त्यानंतर त्यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता कंगना रणौतने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत त्या मागचे कारण सांगितले आहे.
कंगनाने तिच्या ट्विटर म्हटले आहे की, मला अनेक हितचिंतकांचे आणि मीडिया मधील लोकांचे फोन येत आहेत. सगळ्यात आधी मी सुरक्षित आहे. मी ठीक आहे. आज चंडीगड विमानतळावर जी घटना घडली आहे. ती घटना सुरक्षा तपासणी केल्यानंतर मी जशी तिथून निघाले. तेव्हा दुसऱ्या केबिनमध्ये जी महिला होती. जी CISF जवान होती. त्या महिलेनं माझ्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षाकाला तिथून पुढे जाण्यापर्यंत प्रतीक्षा केली. त्यानंतर पुढे येऊन त्यांनी माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर अपशब्द वापरले. त्यानंतर मी जेव्हा त्यांना विचारलं की असं का केलं? तर त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मी सुरक्षित आहे. पण मला एकच चिंता आहे की पंजाबमध्ये जो दहशतवाद आणि अतिरेक वाढतोय. आपण त्या सगळ्याला कसं हाताळायचं.
राणौतला थप्पड मारणारी सीआयएसएफची महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने सांगितले की, शेतकरी तिथे १०० रुपयांसाठी बसले आहेत, असे विधान तिने केले होते. ती तिथे जाऊन बसेल का? तिने हे विधान केले तेव्हा माझी आई तिथे बसून निषेध करत होती.