नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोत विनातारण व जामीनदार न देता पाच लाख रूपयाच्या कर्जाचे आमिष दाखवून ३४ लाख १६ हजार ३८२ रुपयाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणूकीत सिडकोतील अनेकाना लाखोचा गडा घातण्यात आला आहे. या घटनेत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली सुमारे ३४ लाख १६ हजार ३८२ रुपयाची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.
या फसवणूक प्रकरणी पोलिस स्थानकात सोपान राजाराम शिंदे (रा. मु. पो. नानेगाव, ता. जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी भूषण वाघ, बँकेचे संचालक मंडळ, वर्षा पाटील, मेघा योगेश बागूल, मनीषा सुरेश पाटील, अमित अनंत बने, सुरेश विनायक पाटील, चंद्रशेखर लक्ष्मण कडू, एकनाथ निवृत्ती पाटील, योगेश गुलाब पाटील, बँके तील व्यवस्थापक व नेमणुकीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत. लाख रुपयांचे कर्ज कमी व्याजदरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून सभासदांची ३४ लाख रुपयांची फसवणूक करून बँकेला टाळे ठोकून फरारी झालेल्या संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.