इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेअर मार्केटमधील घोटाळाच बाहेर काढला आहे. देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपने केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याची जेसीपी (संयुक्त संसदीय समिती) मार्फेत चौकशी करण्याची मागणी केली आहे. एक्झिट पोलच्या दिवशी शेअर मार्केट वाढले व निकालानंतर पडले यावरुन त्यांनी भाजपला घेरले आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी तीन मुद्दे या घोटाळ्याची संबधीत उपस्थितीत केले आहे.
स्टॉक मार्केट घोटाळ्याशी संबंधित आमचे तीन प्रश्न:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील जनतेला बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला का दिला?
- पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी दोन्ही मुलाखती अदानीच्या वाहिन्यांना दिल्या ज्यावर सेबीची चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत त्या वाहिन्यांची भूमिका काय?
- भाजप, बनावट एक्झिट पोल आणि परदेशी गुंतवणूकदार यांच्यात काय संबंध आहे?
त्यामुळे या घोटाळ्याची जेपीसी चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.