इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अंधेरी न्यायालयाने २७ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही सुनावणी सुरु झाल्यापासून ललित पाटील कोर्टासमोर हात जोडून उभा होता. साकीनाका पोलिसांनी चार आरोपींना कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने नाशिकच्या कारखान्याबाबत माहिती विचारल्यानंतर या जागेबाबतची माहिती समोर आली आहे. या सुनावणीत सरकारी वकिलांनी सांगितले की, कांबळे या व्यक्तीच्या नावे ही जागा लिज वर घेतली आहे. कांबळे या व्यक्तीने यादव या व्यक्तीला कारखाना चालवायला दिला होता. भूषण पाटील हा यादव यांना गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून भाड्याची रक्कम देत असल्याचे सांगितले.
ललिल पाटील याची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे त्याअगोदर पोलिसांनी त्याला रविवारी नाशिकला आणून कसून चौकशी केली. त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर पुन्हा पोलिस कोठडी मिळाली आहे. आता पोलिस या ड्रग्ज जाळ्याची संपूर्ण माहिती करुन घेऊन पुरावे अधिक बळकट करणार आहे. साकीनाका पोलिसांनी याअगोदर याच काऱखान्यावर ३०० कोटीचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर ललित पाटील याच्यासह १६ जणांना अटक केली. या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत असून त्याचा संपूर्ण तपास आता पोलिस करणार आहे.
ललित पाटील प्रकरणाता पोलिस कोठडी मागतांना ससून रुग्णालयातातून त्यांच्या सांगण्यावरुन त्याचा भाऊ भूषण पाटील सोबत ड्रग्जचा कारखाना चालवत होता. ललित पाटील याला पळून जाण्यासाठी ड्रायव्हर सचिन वाघ याने मदत केली. हे मोठं रॅकेट आहे. त्यात आणखी आरोपीचा सहभाग आहे. या प्रकरणात ललित पाटील, भूषण पाटील व सचिन वाघ या सर्वांची समोरासमोर चौकशी करायची आहे असे कारण देण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने ललित पाटील याला २७ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.